चलवेनहट्टी येथील प्राथमिक मराठी शाळेत शिक्षण उत्सव (कलिका हब्ब) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष मनोहर हुंदरे होत तर प्रमुख अतिथी म्हणून हंदिगनूर येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जी.एस.पाटील व हंदिगनूर केंद्र प्रमुख एन.बी.बाळीगट्टी व न्यु इदलोंढ येथील कन्नड शाळेच्या मुख्याध्यापिका शितल गोळे होत्या. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थीनींनीच्या इसस्तवन व स्वागत गीताच्या सादरीकरणाने झाले. द्विपप्रज्वलन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित पाहुण्याचे पेन देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी चलवेनहट्टी शाळेचे मुख्याध्यापक एम.सी.वार्णुळकर यांनी प्रास्ताविक करत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की शिक्षण उत्सवच्या माध्यमातून बौद्धिक क्षमता मागास असलेल्या विद्यार्थ्यांच्यातील कला गुण शोधून काढणे आणि त्यांच्या बौध्दिक क्षमतेत सुधारणा व्हावी यासाठी सरकार वतीने दरवर्षी शिक्षण उत्सव कार्यक्रम केंद्रातील वेगवेगळ्या शाळेत साजरा करण्यात येतो असे सांगितले.
बी.एन.बाळीगट्टी यांनी सरकारी शाळांना शासनाकडून मिळणारा सुविधा बाबत माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांची प्रगती बाबत मार्गदर्शन केले
तर आपल्या पाल्याची इतर मुलांबरोबर तूलना करुन त्यांच्यावर दडपण आणू नका त्यांच्याशी संवाद साधा आणी त्यांना कोणत्या कलेत रस आहे त्या शोधा आणी योग्य मार्गदर्शन करा जेणेकरून पाल्याच्या बौध्दिक क्षमतेचा विकास होण्यास मदत होईल असे जी.एस.पाटील यांनी आपल्या मनोगतात सल्ला दिला.
शितल गोळे यांनी मनोगत व्यक्त करताना सध्या घेण्यात येणाऱ्या अभ्यास क्रमाबाबत माहीती देताना शिक्षक व पालकांनी समन्वय साधून आपल्या विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष दिल्यास बौद्धिक क्षमतेने मागास असलेले विद्यार्थी मुख्य प्रवाहात येणास मदत होईल असे आवाहन केले
ग्रामपंचायत सदस्य यल्लाप्पा पाटील यांनी आपल्या पाल्यांना शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी करायचे असेल तर पालकांनी आपल्या पाल्यांकडे अधिक लक्ष दिले पाहिजे प्राथमिक शिक्षण घेत असताना आपण अधिक लक्ष दिल्यास आपला मुलगा यशस्वी होईल असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात मनोहर हुंदरे यांनी मनोगत व्यक्त करतांना बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केला अनुदानित शाळांमधिल विद्यार्थीसाठी सरकारने शिक्षण उत्सव सारख्या स्पर्धांच्या माध्यमातून बौद्धिक क्षमता सधारावी यासह तसेच मध्यान्ह आहार पासून ते पुस्तके,बूट इत्यादी सुविधा विद्यार्थींना उपलब्ध करून दिल्या असून काही पालक खोट्या प्रतिष्ठेपायी मातृभाषेच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेऊन आपल्या पाल्याचे भवितव्य अंधकारमय बनवत आहेत. तसेच सरकारने नवीन मॅगनेटीक योजना आणली आहे. या योजनेच्या आडून सरकारी शाळा बंद करण्याचा घाट घातला जात असल्याची खंतही व्यक्त केली.
तसेच त्यासाठी येत्या काळात पालकांसह शिक्षकांनीही मोठा लढा द्यावा लागणार असल्याचे नमूद केले .
श्रीशैल कमत यांनी आभार प्रदर्शन केले
यावेळी चलवेनहट्टी शाळेच्या शिक्षिका टी.जी.नगरकर यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला बद्दल सत्कार करण्यात आला तर हंदिगनूर केंद्र प्रमुख बी एन बाळीगट्टी यांना मराठा महासंघाच्या वतीने उत्तम कार्यशील केंद्र प्रमुख पाहुणे पुरस्कार मिळाला होता त्यांच्या सर्व शिक्षकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्कारचे स्वरूप फेटा,शाल,श्रीफळ, आसा होता.
यावेळी एन. डी. गुड्डसी, एम.जे.कांबळे,एम.जे.कुरीस,
डी एल.मल्हारी,न्हावी,रुद्रापुरी,हचिमनी, टी.ए.पाटील,निलजी, श्रीमती.दशंवत, श्रीमती डोणकरी,एफ एस सिद्रायणी,उपाध्यक्ष नंदिनी कंलखाबकर, नामदेव पाटील,बाबू सनदी, हाल्लाप्पा आलगोंडी, सतिश होसूरकर, विठ्ठल कंलखाबकर, गुंडू पाटील ,कल्लाप्पा पाटील,लक्ष्मी पाटील, कविता हुंदरे, रेणूका आलगोंडी,दिपा हुंदरे,नंदा पाटील, रेणूका तानाजी आलगोंडी,सरीता पाटील, मनाली हुंदरे,लक्ष्मी बडवानाचे,मंगल पाटील, जयश्री पाटील,एस आर पाटील,विद्या शिरगुप्पी, निशिगंधा मराठे,राजेश्री हुंदरे, अनिता हुंदरे सह हंदिगनूर केंद्रातील शाळेचे शाळा सुधारणा समितीचे सदस्य सदस्या आदी उपस्थित होते
यावेळी केंद्रातील शाळेच्या विद्यार्थ्यांना बौद्धिक क्षमतेनुसार अंक गणित, लेखन,वाचन, चित्रकला, आशा स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या यावेळी यश संपादन केले विद्यार्थींनां बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले.



