No menu items!
Saturday, January 10, 2026

हजारो शिबिरार्थीना मार्गदर्शन कॅपिटल वनचा स्तुत्य उपक्रम -नेताजी जाधव

Must read

अर्थकरणावर आपली पकड मजबूत करीत गेली अनेक वर्षे सातत्याने शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपला कार्याचा ठसा उमटविला आहे.गेली 18 वर्षे संस्थेने एस. एस. एल. सी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी यशस्वी रित्या एस एस एल सी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. आजवर हजारो विद्यार्थ्यांनी सदर शिबिराचा लाभ घेतला असुन यामुळे विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन व परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आत्म विश्वास प्राप्त होताना दिसत आहे असे प्रतिपादन नेताजी जधाव यांनी केले ते या वर्षी भरविण्यात आलेल्या शिबिराचा सांगता समारंभ ज्योती कॉलेजच्या सभागृहात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.प्रदिर्घ काळापासून सुरू ठेवलेल्या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थांनी याचा लाभ घेऊन आपले भविष्य घडवावे असे आवाहनही त्यांनी केले.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाली.चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी प्रास्ताविक व स्वागत करून गेली सतरा वर्षे सातत्याने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत शाळा व विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या प्रतिसादा बद्दल समाधान व्यक्त केले. वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना बराच उपयोग होत असून परीकक्षेला निर्भिडपणे सामोरे जाण्याचे धाडस देखील निर्माण होत आहे असेही त्यांनी नमूद केले.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे व विज्ञान विषयाचे शिक्षक एस व्हि भातकांडे,सविता पवार व शिवाजीराव अतिवाडकर उपास्थित होते.मागील वर्षांमधील शिबिरामधून विषयावर उच्चांकी गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसोबत शिबारमधून सरासरी गुणवता प्राप्त विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देऊन सन्मान यावेळी करण्यात आला.यंदाच्या शिबिरामधून शिबिर्थीनी देखील आपले मनोगत व्यक्त करून उपक्रमाबद्दल व्यक्त करून सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वश्री युवराज पाटील,एस.व्ही.भातकांडे,वसंत पाटील,सी.आय.पाटील,संजीव कोष्टी,संध्या सुतकट्टी, जोतीबा पाटील,पी.आर.पाटील,एम.व्ही. भोसले,सुनील लाड यांनी मोलाचे सहकार्य.यावेळी संस्थेचे संचालक रामकुमार जोशी,शरद पाटील,संजय चौगुले,भाग्यश्री लक्ष्मीकांत जाधव,शाम सुतार, सेक्रेटरी स्नेहल कंग्राळकर, कर्मचारी वर्ग, पिग्मी कलेक्टर उपस्थित होते.सुत्रसंचलन एम.व्ही. भातकांडे यांनी केले

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!