देसूर येथील श्री सातेरी मंदिरातील पूजेच्या वादातून दोन कुटुंबियांमध्ये हाणामारीची घटना घडली आहे. यासंबंधी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात परस्परांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
शुक्रवार दि. २६ डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. विणा विनोंद गुरव यांनी संतोष बाळकृष्ण पाटील यांच्यावर मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे. आरवाच्च शिवीगाळ करीत तोंडातून रक्त
येईपर्यंत आपल्याला मारहाण करण्यात आल्याचे विणा यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
तर रेणुका बाळकृष्ण पाटील यांनी विनोद भरमाण्णा गुरव यांच्यावर मारहाण केल्याची फिर्याद केली आहे. श्री सातेरी माउली मंदिरात पूजेसाठी गेले असता आपल्याला शिवीगाळ करीत मारहाण केल्याचे रेणुका यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. श्री सातेरी माउली मंदिराच्या पूजेवरुन ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमणीगौडर पुढील तपास करीत आहेत



