दरवर्षीप्रमाणे न्यू गुड्स शेड रोड बेळगाव येथील नर्तकी प्राइड व किरण प्लाझा या दोन्ही अपार्टमेंटमधील रहिवाशी वर्ष अखेरीस स्पर्धा आयोजित करतात या स्पर्धा तेथील रहिवाशांसाठी मर्यादित असतात या स्पर्धा लहान गट महिला व पुरुष गटासाठी आयोजित करण्यात आल्या होत्या या गटांमध्ये बॅडमिंटन कॅरम क्रिकेट यामध्ये आभाळवृद्धाने सहभाग घेतला होता या स्पर्धा नुकत्याच अति उत्साहात पार पडल्या या स्पर्धांचे विजेते ठरले, हाफ पिच क्रिकेट पुरुष विभाग नर्तकी स्पार्कल विजेते तर पोरवाल वारीयर्स उपविजेते, महिला क्रिकेट नर्तकी चॅलेंजर्स विजेते तर नर्तकी स्ट्राईकर्स उपविजेते,
बॅडमिंटन लहान गट सिद्धी जनगौडा विजेती तर दर्शमंगल आणि उपविजेता, महिला बॅडमिंटन मोक्षा मुंदडा विजेती तर उपविजेती मनीषा पोरवाल, पुरुष बॅडमिंटन विराज किरण जाधव प्रथम तर उपविजेता अभिषेक शहा, कॅरम लहान गट मिलन जैन विजेती तर उपविजेते क्रीश पोरवाल महिला कॅरम मीनाक्षी जांबोटकर विजेती अर्पिता मंगलानी उपविजेती पुरुष कॅरम रघु ओझा विजेता तर उपविजेता भावेश पोरवाल ठरला.
सर्व विजेत्यांना बक्षीस समारंभासाठी म्हणून प्रमुख पाहुणे विकास कलघटगी, धनंजय पाटील व पोरवाल परिवार उपस्थित होता, या स्पर्धांना बादल पोरवाल व परिवाराने आकर्षक चषक देणगी दाखल दिले होते,
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नितेश जैन, महेश शर्मा,राकेश सकरिया,किरण शर्मा,रघु ओझा, भरत मंगलानी,भावेश जैन, हर्षद शहा, अंकित पोरवाल, कैलास जैन,हर्षित मोदानी, दुर्वांक पाटील व इतरांचे सहकार्य लाभले.



