आज जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. बेळगाव दौऱ्यावर आल्यानंतर ते महापालिका हद्दीतील विकास कामांची पाहणी करणार आहेत त्यानंतर स्मार्ट सिटी योजनेच्या कामाचा आढावा घेणार आहेत.
बेंगळूरहुन दुपारी 2.55 ते सांबरा विमानतळावर दाखल होणार आहेत .तर दुपारी चार वाजता ते बेळगावात दाखल होऊन सर्व कामांचा आढावा घेणार आहेत. तसेच रात्री बेळगावात मुक्काम करून उद्या सकाळी सुवर्णसौध मध्ये आयोजित केलेल्या बैठकीत ते सहभागी होणार आहेत.
तसेच दिनांक 26 आणि 27 रोजी ते बागलकोट जिल्ह्याचा दौरा करणार असून 27 तारखेला सायंकाळी 5 ला पुन्हा बेळगावला येऊन मुक्काम करणार आहेत. तसेच 28 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते दुपारी दोन पर्यंत पाटबंधारे खात्याच्या कामाची पाहणी करून पुन्हा बागलकोटला रवाना होणार आहेत.