निप्पाणी तालुक्यातील कारदगा गावातील सूरज बागोजी हा युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकला आहे.सूरज चार वर्षांपासून युक्रेन देशातुन एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. काल रात्री त्याची आई राणी बागोजी राहणार कारदगा यांची त्याच्याशी बातचीत झाली होती .यावेळी त्याने त्यांना आपण सुरक्षित असल्याचे सांगितले होते .
मात्र, शुक्रवारी सकाळी त्यांनी परत सूरजला फोन केला असता त्याने कॉल रिसिव्ह केला नसल्याचे सांगण्यात आले आहे .त्यामुळे बागोजी कुटुंबीयामध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले असून आपला मुलगा सुरक्षित मायदेशी परतावा अशी त्यांची मागणी आहे .
बेळगावचे आणखी दोन विद्यार्थी – एक गोकाकचा आणि दुसरा रायबागचा – युक्रेनमध्ये अडकले आहेत. सर्व भारतीयांना देशात परत आणण्यासाठी सरकारचे सतत प्रयत्न सुरू आहेत.