रशियाने यूक्रेन वर केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेन येथील परिस्थिती भयानक बनली आहे. नागरिकांना सुरक्षेसाठी बंकर मध्ये हालवण्यात आले आहे .कर्नाटकातील एकूण 14 विद्यार्थीही या बंकरमध्ये हलवण्यात आले असून त्यापैकी आठ विद्यार्थी उत्तर कर्नाटक अर्थात बेळगाव परिसरातील आहेत.
अन्नपाण्याविना हे विद्यार्थी बंकरमध्ये असून त्यांनी आपले फोटो आपल्या नातेवाईकांना तसेच सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.
बंकर मध्ये सुरक्षित वातावरणात विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारने विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. यासंदर्भात कर्नाटक सरकार परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क करीत असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.