येथील खडेबाजार पै हॉटेल समोरील गटारीतील पाणी रस्त्यावर आल्याने व्यावसायिकांना व्यवसाय करणे कठीण बनले आहे. याठिकाणी मेन रोडवर सीडीवर्क चे काम केल्याने तसेच गटारीत अनेक केबल वाहिन्या घातल्यामुळे सांडपाणी पुढे न जाता मागे एक असल्याने पाणी पाण्याचा निचरा होण्यास व्यत्यय येत आहे. परिणामी गटारीचे सर्व सांडपाणी रस्त्यावर येत असून नागरिकांना आणि व्यवसायिकांना या मार्गावरून जाणे कठीण बनले आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून ही परिस्थिती जैसे थे असून या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. तसेच व्यापारी देखील या समस्येने हैराण झाले आहेत. या सांडपाण्यामुळे नागरिकांना अनेक आरोग्याच्या तक्रारी भेडसावत आहे.
तसेच ग्राहकांना जर एखादी वस्तू खरेदी करावयाची असल्यास सांडपाण्यातूनच वाट काढावी लागत आहे. त्यामुळे ग्राहक आणि व्यवसायिक संतापले असून ते तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. जर येथील काम लवकरात लवकर पूर्ण झाले तर येथील व्यवसायिकांनी महानगर पालिकेवर मोर्चा आणून आणि आंदोलन करू असा इशारा दिला आहे.