शहरात आनंदवाडीच्या कुस्ती आखाड्यात बेळगाव मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्यावतीने मोफत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. उद्या रविवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता या कुस्त्यांना प्रारंभ होणार आहे
शहर परिसरातील कुस्ती शौकिनांना जवळपास 50 हून अधिक जंगी कुस्त्या उद्या पाहण्याची संधी प्राप्त होणार आहे. या जंगी कुस्त्यांच्या मैदानाचे उद्घाटन पोलीस आयुक्त डॉक्टर एम बी बोर्लिंगय्या आणि डॉक्टर गणपत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
तसेच उद्या प्रथम क्रमांकाची कुस्ती पैलवान नागराज बसीडोनी आणि पैलवान संतोष पडोलकर यांच्यात होणार आहे. तर या जंगी कुस्ती मैदानाचा बेळगाव परिसरातील कुस्ती शौकिनांनी लाभ घ्यावा असे आवाहन मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेने केले आहे.