पैश्याच्या देवाणघेवाण व्यवहारमधून पाईपने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याच्या आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे .सदर आरोपींची निर्दोष मुक्तता येथील दुसरे जे. एम. एफ. सी न्यायालयाने केली असून परशुराम भवरसिंग धमोणे वय ७० गजानन परशुराम धमोणे, वय: ३३ आणि शारदा अशोक धमोणे वय ३० सर्वजण राहणार ढोरवाडा चव्हाट गल्ली बेळगाव या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे .
याबाबत मार्केट पोलीसात फिर्यादी विलास कृष्णा धमोणे राहणार ढोरवाडा चव्हाट गल्ली, बेळगांव यांच्या फिर्यादीवरुन,फिर्यादी विलास व आरोपी परशुराम याचा मुलगा अशोक धमोणे या दोघामध्ये पैशाचा व्यवहार देणेघेणे होते त्या व्यवहारातूनच फिर्यादी व अशोक धमोणे याच्यात वरचेवर भांडण तक्रार होत होती.
दिनांक: २६-११-२०१७ रोजी दुपारी ३.३० वाजता सदरी आरोपी फिर्यादीच्या घरासमोर येवून अशोक बरोबर तुम्ही भांडण तक्रार का करता असे विचारले आणि याच रागातून आरोपींनी फिर्यादीला अर्वाच शिवीगाळ करुन तेथेच असलेल्या ड्रेनेज पाईपने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण केली त्यामुळे फिर्यादी गंभीर जखमी झाला .
त्यानंतर आरोपींनी विनोद रमेश धमोणे यालाही मारहाण करून जखमी केले नंतर हातापायांनी मारुन जाताना परत आमच्या नादाला लागला तर तुम्हाला जीवे मारतो अशी धमकी देवून निघून गेले त्यानंतर फिर्यादीने मार्केट पोलिसात फिर्याद दाखल केली .पोलीसांनी भा.द.वि कलम ३२६, ३४१, ३२४, ५०४, ५०६ सह कलम ३४ प्रकारे गुन्हा दाखल करुन आरोपीवर न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आले. सरकारतर्फे साक्षीदार तपासण्यात आले पण साक्षीदारातील विसंगतीमुळे सदरी आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.