हिंडलगा येथील महालक्ष्मी देवी यात्रोत्सव संघातर्फे दि. 27 रोजी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा.शिरवाडकर यांचा जन्मदिन हा जागतिक मराठी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महालक्ष्मी देवी यात्रोत्सव संघाचे अध्यक्ष कृष्णा पावशे व मार्गदर्शक रमाकांत पावशे उपस्थित होते. हा कार्यक्रम व्यायाम शाळेच्या सभागृहात संपन्न झाला.
प्रथम निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बेळगुंदकर यांनी प्रास्ताविक मनोगत केले व प्राथमिक मराठी शाळेतील शारीरिक शिक्षक रमेश सुणगार यांचेदि. 26 रोजी निधन झाले, तसेच युवा कार्यकर्ते प्रविण कुडचीकर यांच्या निधनामुळे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी पदाधिकारी उदय नाईक, राजू कुपेकर,बंटी सरप याची भाषणे झाली.प्रकाश बेळगुंदकर यानी आपल्या मातृभाषेचे महत्त्व सांगितले. यावेळी मराठी भाषेच्या गौरवार्थ घोषणा दिल्या. यावेळी कांही मराठी
गीते सादर करण्यात आली. मार्गदर्शक रमाकांत पावशे यानी यात्रोत्सवचा पहिला वर्धापन दिन शासनाने दिलेले नियमांचे पालन करावे असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात शिस्त व सर्वांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले . शेवटी आभार तुकाराम फडके यांनी मानले. कार्यक्रमाला यात्रोत्सव संघाचे पदाधिकारी प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.