महाशिवरात्री निमित्त सनातन संस्थेचा विशेष लेख, अवश्य वाचा…..
प्रतिदिन शिव रात्रीच्या ४ प्रहरांमध्ये एका प्रहरात विश्रांती घेतो. एक प्रहर म्हणजे भूमीवरचे ३ घंटे म्हणजे देवाचे अर्धे मिनिट. देवाची एक रात्र म्हणजे भूमीवरचे एक वर्ष. भूमीवरच्या दिवसात ४ प्रहर आणि रात्री ४ प्रहर असे २४ घंट्यात ८ प्रहर असतात. एक प्रहर ३ घंट्यांचा असतो.
शिवाच्या गाढ निद्रावस्थेच्या (प्रदोष काळात) काळात केलेल्या उपासनेचे लाभ :
जेव्हा शिव विश्रांती घेत असतो, त्या ३० सेकंदातच काही क्षण शिवाची गाढ निद्रावस्था (समाधी अवस्था) असते. त्याला प्रदोष अथवा
केलेल्या उपासनेत दोष असले तरी १०० टक्के फलप्राप्ती होते. हा वर शंकरानेच दिला आहे. या प्रदोष कालात शिवलिंगाला अभिषेक करतात. प्रदोषकाळात केलेल्या अभिषेकाला ‘महा-अभिषेक’ म्हणतात. प्रदोष कालात शिवाचा नामजप केल्याने अनिष्ट शक्तींकडून त्रास न होता रक्षण होते. भगवान शंकर रात्रीच्या एक प्रहर विश्रांती घेतो. भगवान शंकर रात्रीचा एक प्रहर विश्रांती घेतो. त्या प्रहरालाच ‘महाशिवरात्री’ म्हणतात. महाशिवरात्रीला शिवाची उपासना करण्याचे शास्त्र असे आहे- शिवाच्या विश्रांतीच्या वेळी शिवतत्त्वाचे कार्य थांबते. म्हणजे त्यावेळी शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातो. शिवाची समाधी स्थिती म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ. त्यामुळे त्या काळात शिवतत्त्व विश्वातील अथवा ब्रह्मांडातील तमोगुण स्वीकारत नाही. त्यामुळे ब्रह्मांडातील तमोगुण अधिक वाढतो अथवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड असतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून अधिक प्रमाणात शिवतत्त्व आकर्षून घेणारी बेलाची पाने, पांढरी फुले, रुद्राक्षांची माळ इत्यादी शिवलिंगाला अर्पण करून वातावरणातील शिवतत्त्व आकर्षून घेतले जाते. त्यामुळे अनिष्ट शक्तींमुळे वाढलेला दाब आपल्याला तेवढा जाणवत नाही. त्यासाठी आपण त्या काळात शिवतत्त्वाचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक ‘ॐ नमः शिवाय’ हा नामजप करावा. हा नामजप सनातन निर्मित चैतन्यवाणी ॲप मध्ये उपलब्ध आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. वाचक ती ॲप डाऊनलोड करून त्याचा लाभ घेऊ शकतात.
Sanatan Chaitanyavani Android App Download Link : Sanatan.org/Chaitanyavani
आधार : सनातन निर्मित ग्रंथ ‘शिव’
आपला विश्वासू
श्री. विनोद कामत
प्रवक्ता, सनातन संस्था
संपर्क : ९३४२५९९२९९
……………………………………………………
शिवाचा विश्रांतीचा काळ म्हणजे काय ?
![IMG-20220228-WA0027](https://belgaavkesari.in/wp-content/uploads/2022/02/IMG-20220228-WA0027.jpg)