उद्योगात महिलांची उपस्थिती वाढवण्याचा कर्नाटक सरकारचा विचार आहे. यासाठी महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी कर्जाच्या माध्यमातून पाठिंबा देऊ केला जात आहे.
कर्नाटक इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी सोसायटीने निश्चित केलेल्या महिला उद्योजक आणि महिलाप्रणित स्टार्टअप्सना १० लाख रुपयांचे थेट कर्ज देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री बोम्मई यांनी केली.
कर्नाटक राज्य महिला विकास महामंडळाच्या माध्यमातून हे कर्ज देण्यात येणार आहे. तसेच, सरकारने एससी/एसटी समाजातील 300 महिला पदवीधरांना उद्योजक होण्यासाठी मदत करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आयआयएम, बेंगळुरूच्या माध्यमातून याची सोय केली जाणार आहे.
अविवाहित, घटस्फोटित महिला आणि लैंगिक अल्पसंख्याकांसाठी मासिक पेन्शन ६०० रुपयांवरून ८०० रुपये करण्यात येणार आहे.याचा लाभ महिलांना होणार असून योग्य मार्ग निवडून पुढे जाण्याची संधी मिळाली आहे.