डेल्टाएसवायएस ई फॉर्मिंग डेव्हलपर या बेळगाव येथील ३ डी प्रिंटिंग मशीन्स उत्पादक कंपनीने आपला स्वदेशी बनावटीचा काँक्रीट ३ डी प्रिंटर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईला वितरित केला आहे.
डेल्टासवायएस ई फॉर्मिंग हे बेळगाव स्थित हार्ड-कोर मशीन डेव्हलपर आणि मॅन्युफॅक्चरर आहे. कंपनी एफडीएम, डीएलपी, हाय-परफॉर्मन्स एफडीएम, लार्ज एफडीएम, पेलेट एक्सट्रूजन टेक्नॉलॉजी, कंपोझिट थ्रीडी प्रिंटर, क्ले थ्रीडी प्रिंटर आणि आता काँक्रीट थ्रीडी प्रिंटर अशा सर्व प्रकारच्या थ्रीडी प्रिंटिंग मशीन्स विकसित करते.
काँक्रीट थ्रीडी प्रिंटरमध्ये कंपनी बिग गॅंट्री सिस्टम तसेच रोबोटिक आर्म्स तयार करू शकते.
सध्या ही कंपनी भारतातून एका बहुराष्ट्रीय बांधकाम कंपनीसाठी बिग गँट्री काँक्रिट थ्रीडी प्रिंटर बनवत आहे, जी चार मजली इमारती बांधू शकते.
भारतात स्वदेशी थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कंपनी भारतातील सर्व प्रमुख संशोधन संस्थांसोबत काम करत आहे.