पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपने तीन राज्यांमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्याने बेळगावातील भाजप कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्याने राणी चन्नम्मा सर्कलमधील गणेश मंदिरात भाजप कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली. त्यानंतर सर्कलमध्ये जाऊन फटाके वाजवले, मिठाई वाटली आणि घोषणाबाजी केली.
यावेळी बोलताना भाजप नेत्या उज्ज्वला यांनी पाच राज्यांच्या निवडणुकीत आलेल्या भाजप राजवटीचं कौतुक केलं. हा केवळ भाजप कार्यकर्त्यांचा विजय नाही. हा जनादेश म्हणजे हिंदुत्व, राष्ट्रवाद आहे आणि जागतिक गुरू बनविण्याचा भारताचा प्रयत्न जिंकला आहे. पुढील सर्व निवडणुकांमध्ये भाजप दणदणीत विजय मिळवेल, असा विश्वास यांनी व्यक्त केला.
विजयोत्सवात शहरातील नेते शशिकांत पाटील, नेते मुरुगेंद्र गौडा पाटील, दिग्विजय सिधनाल, भाजपचे पालिकेतील सदस्य, कार्यकर्ते, नेते उपस्थित होते.