No menu items!
Thursday, November 21, 2024

बेळगावच्या व्हीटीयूमध्ये 21 वा दीक्षांत समारंभ : तीन जणांना डॉक्टर ऑफ सायन्स, 10 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक

Must read

प्रतिष्ठित विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यालयाचा २१ वा वार्षिक दीक्षांत समारंभ बेळगाव शहरात पार पडला. विद्यापीठाच्या अब्दुल कलाम सभा भवनात झालेल्या या कार्यक्रमाला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली दीक्षांत समारंभ झाला. उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथ नारायण आणि व्हीटीयूचे कुलपती करिसिदप्पा या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पद्मभूषण आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक सेनापती क्रिश गोपालकृष्णन, पद्मभूषण विजेते हैदराबाद येथील इंडियन बायोटेकचे अध्यक्ष डॉ. कृष्णा एला आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू येथील शारीरिक विज्ञान विभागाच्या प्राध्यापिका रोहिणी गोदबोल यांना डॉक्टर ऑफ सायन्स या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विविध विद्याशाखांतील दहा विद्यार्थ्यांना सुवर्णपदकांचे वाटप करण्यात आले.
या वेळी रायचूरच्या एसएलएन कॉलेजची सिव्हिल इंजिनीअरिंगची विद्यार्थिनी बुशरा मतीन हिने १६ सुवर्णपदके, बेंगळुरूच्या बीएनएम इंजिनीअरिंग कॉलेजची विद्यार्थिनी स्वाती दयानंद हिने ७ सुवर्ण , बेंगळुरूतील ओ रम्या टी ६, बेंगळुरूतील प्रज्ञा एन ४, शिवमोगा येथील पल्लवी पी ४, बेंगळुरूतील तेजस्विनी आर ४, बेंगळुरूतील आश्विता एन ३, दावणगेरे सविता एच.टी. ३ सुवर्णपदकांचे वितरण करण्यात आले. यावेळी विविध विषयांतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!