बेळगाव हून दिल्ली ला जाणे आता अतिशय सहज आणि सोपे होणार आहे. आठवड्यातून एक दोन वेळा नव्हे तर दररोज दिल्लीसाठी विमानाची सोय मिळाली आहे.स्पाइसजेट विमान कंपनीने 27 मार्चपासून बेळगावहून राष्ट्रीय राजधानीत दररोज उड्डाण करण्याची घोषणा केल्याने सांबरा विमानतळाने आणखी एक मोठी झेप घेतली आहे. उत्तर कर्नाटकात कोणत्याही शहराला दररोज थेट दिल्लीला विमानसेवा मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
हे विमान दिल्लीहून रोज सकाळी ६.०५ वाजता सुटेल आणि सकाळी ८.४५ वाजता बेळगावला पोहोचेल. याचे प्रवास भाडे ५,६८६ रुपये असेल.
परतीच्या प्रवासात हे विमान बेळगाव हून रोज सकाळी ९.१५ वाजता सुटेल आणि ११.४५ वाजता दिल्लीला पोहोचेल. या विमानाचे भाडे ५,७७१ रुपये असेल. बेळगाव ते दिल्ली हा विमान प्रवास जवळपास 2 तास 40 मिनिटांचा आहे. स्पाइसजेटने या विमानाला ‘मिनीमाइझ द डिस्टन्स, मॅक्सिमाइज युवर बिझनेस’ असा नारा दिला आहे.
स्पाइसजेट ची वेबसाईट http://www.spicejet.com/ आणि इतर ऑनलाइन बुकिंग प्लॅटफॉर्मच्या वेबसाइटवर बुकिंग आधीच खुले करण्यात आले आहे. स्पाइसजेटने ऑगस्ट महिन्यात दिल्ली-बेळगाव दरम्यान आठवड्यातून दोन वेळा विमानसेवा सुरू केली होती. त्यानुसार विमान कंपनीला या विशिष्ट विभागात जास्त प्रवासी वाहतूक मिळाली; त्यामुळे आठवड्यातून चार दिवस वारंवारता वाढविण्यात आली. आता 27 मार्चपासून रोजची विमानसेवा सुरू होणार आहे.
स्पाइसजेट मुंबई आणि हैदराबाद या शहरांसाठी दररोज विमानसेवा देत आहे.आता रोजचे दिल्ली साठीचे विमान ही राजकारणी,उद्योजक आणि पर्यटन करणाऱ्या व्यक्तींसाठी मोठ्या सोयीची बाब ठरणार आहे.