551 प्रकाराची लहान मुलांची रशियन पॅटर्न लोकरीचे स्वेटर 551 दिवसात तयार केल्याबद्दल बेळगावच्या आशा पत्रावळी यांची दखल इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.केवळ दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या आशा पत्रावळी यांनी विणकाम या विषयावर सहा पुस्तके लिहिली आहेत हे कौतुकास्पद आहे .
तसेच त्यांनी वेगवेगळे पक्षी फुले कार्टूनची विविध पात्रेपण अशा विविध प्रकारच्या वस्तू लोकरीचे विणकाम करून अशा त्यांनी तयार केले आहेत.गेल्या चाळीस वर्षाहून अधिक काळातल्या लोकरीचे विणकाम करत त्यांनी आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान बेळगाव मध्ये निर्माण केले आहे.
त्यांनी रशियन पॅटनचे स्वीटर केवळ चित्र पाहून तयार केली आहेत .त्या शिवाय लहान मुलांचे विविध प्रकारचे स्वेटर तयार करून प्रदर्शन देखील भरविले आहे.त्यांचे प्रदर्शन गोवा बेळगाव कोल्हापूर येथे भरली असून नागरिकांचा देखील या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. तसेच सध्या त्यांची लिमका बुक ऑफ रेकॉर्ड सह अनेकांनी दखल घेतली आहे.