जत्तीमठ येथे येत्या रविवारी म्हणजे 13 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता मराठा समाजाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत खासदार संभाजीराजे आणि मंजुनाथ स्वामी यांच्या सत्कार कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.
सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने 15 मे रोजी मराठा समाजाचे स्वामी श्री मंजुनाथ स्वामी यांचा सत्कार आयोजित केला आहे. तरी या सत्कार समारंभाच्या आयोजनाकरिता सर्व समाज बांधवांनी सायंकाळी 5 वाजता जत्तीमठ येथे उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.