बामणवाडी येथील शांताई वृद्धाश्रमातील आजी आजोबांना दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सहलीला नेण्यात आले होते.आज रविवार दिनांक 13 मार्च सकाळी 8 वाजता वृद्धाश्रमातील सर्वांना सौदत्ती येथील यल्लमा देवीच्या दर्शनाला आणि इतर ठिकाणांच्या सहलीला नेण्यात आले .
प्रारंभी चन्नम्मा सर्कल येथील गणपती मंदिरानजीक बसला हार घालून आणि श्रीफळ वाढवून सहलीच्या प्रवासाला प्रारंभ झाला.शांताई चे चेअरमन विजय पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
त्यानंतर बसवराज मुनवळळी यांनी सर्वांसाठी नाष्टाची सोय केली त्यानंतर दुपारी सौदत्ती रामलिंग देवस्थान कमिटीचे बाळोजी केदूर यांनी जेवणाची सोय केली तसेच सौदत्ती मध्ये दर्शन देखील घडवून आणले .
सहलीसाठी भरतेश होमीयोपॅथीक कॉलेज यांनी बस दिल्याने त्यांचे कार्याध्यक्ष विजय मोरे यांनी विशेष आभार मानले . यावेळी संजय वालावलकर, राजू मुलीनमनी, वसंत बालिगा,अॅलन मोरे, अरेन नलवडे, शरल मोरे, विजया पाटील, मारिया मोरे, शांताई पाटील, शुभम वाघवडेकर, दत्ता घोरपडे,भाऊराव पाटील यांच्यासह शांताई वृद्धाश्रमातील सर्व आजी आणि आजोबा उपस्थित होते .