No menu items!
Friday, November 22, 2024

‘द काश्मीर फाइल्स’ कर्नाटकात करमुक्त

Must read

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काश्मीर फाइल्स हा चित्रपट कर्नाटकात करमुक्त होणार असल्याची घोषणा केली.
त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “विवेक अग्निहोत्री या चित्रपट निर्मात्याने द काश्मिरी फाईल्स हा चित्रपट तयार करून दाहक वास्तव दाखवून दिले आहे.
काश्मिरी पंडितांना त्यांच्या मायभूमीतून बाहेर काढणारे हे वास्तव दुर्दैवी आहे. रक्त आटवणारे, मार्मिक आणि प्रामाणिक कथन केल्याबद्दल त्यांचे कौतुक आहे.
या चित्रपटाला आमचा पाठिंबा देण्यासाठी आणि आमच्या लोकांना तो पाहण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, आम्ही कर्नाटकात हा चित्रपट करमुक्त करू.”असे मुख्यमंत्री म्हणाले.
हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांनी या चित्रपटासाठी आपले योगदान देण्यास सुरुवात केली आहे.अनेक नेते हा चित्रपट स्वतःच्या खर्चाने आपल्या मतदारसंघात दाखवत आहेत.आता त्यात करमुक्तीच्या घोषणेने आणखी भर पडली आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!