भ्रष्टाचारी प्रकरणांवर झालेल्या तक्रारींची वेळेत दखल घेण्यात यावी. तक्रारदारांना योग्य प्रतिसाद देऊन ज्यांच्यावर तक्रार झाले आहे त्यांच्यावर वेळेत कारवाई करावी. अन्यथा एसीबीच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा आप नेते आणि कार्यकर्त्यांनी आज एसीबीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
भ्रष्टाचार निर्मूलनासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसीबी चा नेमका उद्देश काय? असा प्रश्न विचारून एसीबीने कारवाईच्या संदर्भात चालवलेला दिरंगाईचा कारभार संतापजनक असल्याचे यावेळी आपमध्ये नुकतेच दाखल झालेले राजीव टोपन्नावर यांनी सांगितले. दरम्यान एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आता कंबर कसून कामाला लागावे. तक्रारदारांनी केलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी. राजकीय व्यक्तींच्या दबावाखाली येऊन कारवाया टाळू नयेत. अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले आहे.