No menu items!
Tuesday, December 3, 2024

भल्या पहाटे बांधकाम व्यावसायिकाचा खून

Must read

शहरातील भवानीनगर जवळ एका बांधकाम व्यावसायिकाचा खून झाल्याचा प्रकार मंगळवारी भल्या पहाटे घडला आहे.चाकूने वार करून त्याला ठार करण्यात आले आहे. त्याआधी त्याच्या डोळ्यात आणि तोंडामध्ये मिरची पूड टाकून त्याला भोसकण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे .
या घटनेमुळे टिळकवाडी , भवानीनगर, मंडोळी रोड परिसरात एकच खळबळ माजली आहे. मृताची ओळख पटली आहे.


उपलब्ध माहितीनुसार, मूळचा हलगा येथील रहिवासी असणारा हा राजू नामक बांधकाम व्यावसायिक सध्या संस्कृती पाम टिळकवाडी येथे राहत होता. जागेसंदर्भात काही वादा मधून हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली . पहाटेच्या सुमारास एक फोन कॉल करून त्याला बोलावून घेण्यात आले . त्यानंतर तो आपली स्कोडा कार घेऊन घराबाहेर पडला होता. मात्र तासाभरातच त्याची हत्या झाली असल्याचे वृत्त सामोरे आले आहे.बेळगाव ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!