राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारातील घडामोडींनंतर माजी जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी हे अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत.
ते आज सकाळी बेळगावच्या सांबरा विमानतळावरून दिल्लीला रवाना झाले असून आज संध्याकाळी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत.
गुढीपाडवा महोत्सव संपल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाचे फेरबदल किंवा विस्तार होणार असून, या संदर्भात जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. केएमएफचे अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी यांनी शनिवारी बेळगाव येथे पत्रकारांना सांगितले होते की, रमेश जारकीहोळी यांचे प्रकरण संपत आले असून त्यांना मंत्री होण्यास कोणताही प्रतिबंध नाही.
बेळगाव जिल्ह्यात आता हाय व्होल्टेजचे राजकारण सुरू आहे.
आज दिल्लीला रवाना झालेले रमेश जारकीहोळी हे कोणत्या नेत्याला भेटणार आणि कोणत्या प्रकारचा खेळ खेळणार, हे अद्याप गूढच आहे.