फाल्गुन वद्य तृतीया तिथीप्रमाणे शिवजयंती महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात साजरी करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके कार्याध्यक्ष सुरज कुडूचकर नगरसेवक शिवाजी मंडोळकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर आणि सचिन केळवेकर यांनी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला.
याप्रसंगी ध्येयमंत्र आणि प्रेरणमंत्र म्हणून शिवरायांचा जयजयकार करण्यात आला.
यावेळी सरचिटणीस श्रीकांत कदम, दक्षिण विभाग प्रमुख प्रवीण रेडेकर, संतोष कृष्णाचे, कल्लाप्पा पाटील, गजानन निलजकर आदी उपस्थित होते.