विविध विकासकामांसाठी अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी मनपाच्या मोकळ्या जागांचा लिलाव करण्यात येणार आहे, तर व्यापारी संकुलांच्या भाड्यात लवकरच वाढ करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आणि मनपा प्रशासक एम. जी. हिरेमठ यांनी सांगितले आहे.
आर्थिक वर्ष 2022-23 साठी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
एमएम एक्स्टेंशनमधील ३७ जागांचा ई-लिलाव केला जाईल जिथे २५ कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे आणि व्यावसायिक संकुलांच्या भाड्यातही वाढ केली जाईल, असे ते म्हणाले.
लवकरच, शहर महानगरपालिका त्यांच्या मालमत्ता कर आणि पाणी उपकराबद्दल सतर्कतेसाठी मोबाइल एसएमएस प्रणाली सुरू करणार आहे.
6.31 लाख अतिरिक्त अर्थसंकल्पाचे प्रस्तावित अंदाजपत्रक पुढीलप्रमाणे –
अपेक्षित उत्पन्न ४४७.६५ कोटी रु.
प्रस्तावित खर्च ४४७.५८ कोटी रु.
तपशील:
उद्यमबाग औद्योगिक क्षेत्रातील पिण्याचे पाणी, शौचालय, पथदिप आदींसाठी २०० लाख रु.
- ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यास प्रत्येक घरात डस्टबीन वाटण्यासाठी २०० लाख रु.
- शहर बाजारपेठ परिसरात महिलांसाठी गुलाबी रंगाची स्वच्छतागृहे बांधण्यासाठी १०० लाख रु.
- बचतगटांच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी ५० लाख रुपये विशेष निधी .
- पथदिव्यांच्या देखभालीसाठी ५५० लाख रु.
- शहरातील रस्ते, गटार, पदपथ, तसेच पावसाळी गटारे, नामफलक यांच्या देखभालीसाठी राखीव ५५० लाख रु.
- आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी ५०० लाख रुपये स्वतंत्रपणे ठेवले जातील.
- अनुसूचित जाती/जमातीच्या कल्याणासाठी ५०९ लाख रु.
- इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी १६९.३७ लाख रु.
शारीरिकदृष्ट्या अपंगांच्या कल्याणासाठी ११६.८१ लाख रु. - केंद्र सरकारच्या दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (डे-एनयूएलएम) या योजनेअंतर्गत रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्यांसाठी सहा व्हेंडिंग झोन विकसित करण्यासाठी आणि पथविक्रेत्या महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधण्यासाठी ५०० लाख रु.
- शहर महानगरपालिका क्षेत्रात नाना नानी पार्क व बाल उद्यान विकसित करण्यासाठी १०० लाख रु.
- डे-एनयूएलएम योजनेअंतर्गत निराधार महिलांसाठी केंद्र बांधण्यासाठी ५० लाख रु.
- विविध वार्डांमध्ये थोर व्यक्तींचे पुतळे बसविण्यासाठी १०० लाख रु.
- शहरातील रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ६० लाख रु.
- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी ५० लाख रु.
- पत्रकारांच्या कल्याणासाठी ३० लाख रुपये फेरनिश्चिती .
- शेणी वापरून पर्यावरणपूरक अंत्यविधी राबविण्यासाठी ५० लाख रुपये राखीव निधी.
- ५० लाख रुपये संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी.
- १३.६१ लाख रुपये, क्रीडा उपक्रमांसाठी
- जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉल, तसेच हायटेक जिमच्या देखभालीसाठी ५० लाख रु.
- प्लास्टिकमुक्त मोहीम राबविण्यासाठी राखीव १० लाख रु.
- सर्वसामान्यांना विविध सेवा देण्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये संगणक प्रणाली व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २० लाख रु.