तुडीये तालुका चंदगड येथे आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जीवन संघर्ष फाउंडेशन आणि बेळगाव केसरीचे संस्थापक डॉक्टर गणपत पाटील उपस्थित होते.
यावेळी त्यांनी उपस्थितांसमोर डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा आढावा घेतला. तसेच त्यांच्या मार्गदर्शनावर चालण्याचा मोलाचा सल्ला दिला. यावेळी ते म्हणाले की आजच्या युवा पिढीने खटाटोप करणे गरजेचे आहे, आजची पिढी व्यसनाधीन होत चालली आहे मात्र आपल्याला आपल्या जीवनाला आकार द्यायचा असेल तर आत्ताच काहीतरी केले पाहिजे त्यामुळे आपले आणि आपल्या देशाचे नाव उज्वल होईल असे सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज भगवान महावीर ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून परिचय देण्यात आला. या कार्यक्रमाला तुडीये भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते