कर्नाटकातून अनेक भक्त काशीला देव दर्शनासाठी जात असतात त्यामुळे भक्तांना सोयीस्कर व्हावे याकरिता बेंगलोर ते काशी या मार्गावर लवकरच नवीन रेल्वेसेवा सुरू होणार असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली.
कर्नाटकातून निघणाऱ्या भक्तांसाठी राज्य सरकारकडून पाच हजार रुपयांची सवलत देण्यात येईल लवकरच ही योजना सुरू करण्यात येणार आहे त्याचा लाभ सर्व भक्तांनी घ्यावा असे आवाहन मंत्री शशिकला जोल्ले यांनी केली आहे.
त्या आज चिकोडी तालुक्यातील हिरेकोडी ग्रामपंचायत हद्दीतील टांगाकोडी येथील कट्टीकर शिवारात श्री बीरेश्वर देवस्थान विकास कामाचे भूमिपूजन केल्यानंतर बोलत होता यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
तसेच त्यांनी यावेळी बिरेश्वर देवाच्या कृपेने आपली राजकीय दृष्ट्या वाटचाल चालू आहे. या देवाच्या कृपेमुळे आणि आशीर्वादामुळे मला वक्फ आणि हज खाते मिळाले असून आण्णासाहेब जोल्ले यांच्यावर देखील बीरेश्वर देवाचा आशीर्वाद असल्याचे यावेळी सांगितले.
याप्रसंगी ग्रामपंचायत उपाध्यक्षा अनिता देवडकर सुरेश माळी अशोक ढोने राजाराम भोसले अण्णाप्पा यमगर करेप्पा दिनीमनी रेवया हिरेमठ धूळ मोळके अण्णासाहेब गावडे सुभाष चौगुले यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.