इंडो-श्रीलंका इनव्हिटेशनल मास्टर्स मीट शॉर्ट कोर्स स्विमिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये, इंद्रजीत हलगेकर आणि ज्योती होसट्टी यांनी भारताचे प्रतिनिधित्व करताना एकूण 12 पदके जिंकून देशाची मान उंचावली आहे .
इंद्रजीतने 6 स्पर्धांमध्ये भाग घेऊन 4 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके जिंकले , तर ज्योतीने 7 स्पर्धांमध्ये भाग घेऊन 4 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक जिंकले. सदर स्पर्धा श्रीलंकेतील कोलंबो येथे आयोजित करण्यात आली होती.
यावेळी त्यांच्या अभिनंदनाप्रसंगी करंजीमठ येथील श्री.गुरुसिद्ध स्वामीजी यांच्या शुभ हस्ते इंद्रजीत आणि ज्योती यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उत्तरचे आमदार अनिल बेनके,
हे दोन्ही विजेते बेळगाव स्विमिंग क्लब आणि एक्वेरियस स्विम क्लब बेळगावचे सदस्य असून केएलईच्या सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात (ऑलिम्पिक आकार) पोहणे प्रशिक्षक उमेश कलघटगी, सुधीर कुसणे आणि प्रसाद तेंडोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत.
त्यांना डॉ. प्रभाकर कोरेजी, डॉ. विवेक सावोजी, लता कित्तूर, आरटीएन अविनाश पोतदार, मानेक कपाडिया आणि इतरांनी प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला आहे.