गेल्या पंधरा दिवसांपूर्वी वाडी रत्नागिरी येथे चैत्र पौर्णिमेचे दवण्याच्या उत्सवानिमित्त चव्हाट गल्ली येथील देव दादा इराप्पा दादा यांच्या मानाची सासन काठी गेली असता ती काल बेळगावात परतली
यावेळी शिवबसव नगर येथील देव दादामठ मध्ये सकाळी सासनकाठी आणि बैल गाड्यांचे आगमन झाले.यावेळी दुपारी ज्योतिबाची आणि सासनकाठी ची विधिवत पूजा करून आर्थिक करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
वाडी रत्नागिरी येथे देव दादा इराप्पा दादा यांच्या सासनकाठी ला मानाचे स्थान आहे. त्यामुळे बेळगाव येथून दर वर्षी पायी वारी करत जोतिबाची सासनकाठी वाडी रत्नागिरी कोल्हापूर येथे जोतिबा डोंगरावर जाते. गेल्या दीडशे वर्षापासून ही परंपरा चालत आली असून ज्योतिबाची सासनकाठी शिवबसव नगर येथील देवदादा मठात चैत्र पौर्णिमेच्या पाचव्या दिवशी पोहचताच या ठिकाणी आंबील घुगऱ्यांचा नैवेद्य दाखवून महाप्रसादाचे वितरण करण्यात येते. यावेळी बेळगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.