श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या वतीने आज दिनांक 22 एप्रिल रोजी जाहीर सभा आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर जाहीर सभा आणि व्याख्यान सुळगा हिंडलगा येथील मराठी शाळा पटांगण येथे आज सायंकाळी 5 वाजता पार पडणार आहे.
सदर सभा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे धगधगते अग्निकुंड व संस्थापक आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांनी आयोजित केले असून बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागातील सुळगा हिंडलगा या ठिकाणी जाहीर व्याख्यान पार पडणार आहे. तरी सर्व सहकाऱ्यांनी आणि शिवभक्तांनी आपली उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे करण्यात आले आहे.