कारागृहातील कारभारावर नजर ठेवण्याकरिता सरकारने एक नवीन योजना आखली आहे. या योजनेनुसार कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर कॅमेरा बसविणे सक्तीचे करण्यात येणार आहे.
त्यामुळे कारागृहातील गैर कारभार , अधिकाऱ्यांसोबत करण्यात येणारे गैरवर्तन कैद्यामधील भांडणे शिस्तीचे पालन यासह अन्य गोष्टींवर नजर ठेवता येणार आहे. तसेच कारागृहातील गैरप्रकाराला आळा घालण्याकरिता आहे या डिजिटल सुरक्षाव्यवस्था चा उपयोग होणार आहे
कारागृहात हायटेक व्यवस्था करण्यात येणार असून यामुळे सेक्युरिटी फोर्स मोबाईल गांजा नियंत्रणावर मदत तसेच डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर यावर नजर ठेवता येणार आहे.
आधुनिक सुरक्षा कारागृहात उपलब्ध करण्याकरिता उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यामुळे कायद्यांना कारागृहामध्ये चोरट्या मार्गाने पुरविल्या जाणाऱ्या सुविधा तसेच अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला देखील चाप बसणार आहे.