आजपासून बारावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला आहे. सकाळी 10. 15 मिनिटांनी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यात आली. पहिल्यादिवशी बिझनेस स्टडीज व तर्कशास्त्र विषयाचा पेपर सुरळीत पार पडला.
यावेळी परीक्षेच्या काळात कॉपीचा गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रापासून 200 मीटर अंतरापर्यंत 144 कलमान्वये जमावबंदी लागू करण्यात आली होती.तसेच झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचा आदेश देखील बजावण्यात आला होता. या व्यतिरिक्त परीक्षा केंद्र आणि आवारात सीसीटीव्ही कॅमेरा ची करडी नजर होती.
यावेळी सकाळी 10.15 मिनिटांनी सुरू झालेला पेपर दुपारी दीड वाजण्याच्या वेळेस संपला. तत्पूर्वी हीजाब घालून येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नसल्याचे पदवीपूर्व शिक्षण खात्याने स्पष्ट केले होते.आजपासून सुरू झालेली परीक्षा 28 मे रोजी समाप्त होणार आहे.