शहरातील बापट गल्ली येथील नवहिंद युवक मंडळाच्या श्री तुळजा भवानी महिला मंडळाचा उद्घाटन समारंभ काल रविवारी थाटात पार पडला.
बापट गल्ली येथे आयोजित सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके उपस्थित होते. प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर आमदार ॲड. बेनके यांच्या हस्ते महिला मंडळाचे करण्यात आले.
उद्घाटनानंतर श्री तुळजाभवानी महिला मंडळाच्या कार्यकारिणीची घोषणा करताना महिला मंडळ अध्यक्षपदी सविता पाटील, उपध्याक्षपदी शिवानी रजपूत आणि सेक्रेटरीपदी सरोजा पवार यांची नेमणूक करण्यात आली.
आपल्या समयोचित भाषणात या नव्या महिला मंडळाला आमदारांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बापट गल्ली पंचमंडळी, वॉर्ड क्र. 4 चे नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती, भाजप महिला मंडळ अध्यक्षा शिल्पा आदींसह महिला, कार्यकर्ते व गल्लीतील नागरिक उपस्थित होते.