बालमजुरी पद्धत बंद करण्यासाठी तसेच प्रबोधन करण्यासाठी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा प्रशासन व कामगार विभागाच्या वतीने बालकामगार आणि किशोर कामगार रंगदर्शन ग्रामीण विकास संघ धुळगणवाडी, ता. चिक्कोडीतर्फे पथनाट्य जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांच्या हस्ते झाले. यावेळी वाद्य वाजवून बालमजुरी विरुद्ध गाणे सादर करून कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांनी केले.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यात 40 ठिकाणी पथनाट्य कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. बालमजूर आणि किशोर मजुरांना कामावर ठेवून न घेता, शाळेत पाठवून त्यांना शिक्षण देण्याचे ब्रीद घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम यशस्वी होवो अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.
याप्रसंगी कामगार आयुक्त व्यंकटेश शिंदीहट्टी, कामगार उपायुक्त तरनूम, योजनाधिकारी ज्योती कंते हे देखील उपस्थित होते.