गेल्या शंभर वर्षापूर्वी पासून चालत आलेली बेळगाव मधील ही शिवजयंती मिरवणुकीची परंपरा कोरोनामुळे खंडित झाली मात्र यावर्षीही कार्यकर्ते आणि शिवप्रेमी तितक्याच उत्साहाने आणि जल्लोषाने या चित्ररथ मिरवणुकीच्या देखावे या स्पर्धेत सहभागी होत आहेत.
येत्या 4 मे रोजी शहरात शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. याच्या पार्श्वभूमीवर शहरात शिवजयंती चित्ररथ स्पर्धेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले की बेळगाव मधील शिवजयंती ही डोळ्याचे पारणे फेडणारी आहे. महाराष्ट्रापेक्षा बेळगावात शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात येते. तसेच मिरवणुकी द्वारे शिवाजी महाराजांच्या कालखंडातील इतिहास चित्ररथ मिरवणुकीमध्ये दाखविण्यात येतो.
शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शांततेत आणि शिस्तीने पार पाडावी असे आवाहन आमदार अनिल बेनके यांनी कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी केले. तसेच सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना सोयीस्कर व्हावे याकरिता शिवजयंती चित्ररथ मिरवणूक संपर्क कार्यालय येथील धर्मवीर छत्रपती संभाजी चौक येथे सुरू करण्यात आले असून या ठिकाणी सर्व मंडळांनी भेटून स्पर्धेचे नियम व अटी जाणून घ्याव्यात असे आवाहन देखील आमदार अनिल बेनके यांनी उद्घाटन प्रसंगी केले.