रविवार दि. २४ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी सकल मराठा समाज बेळगाव, यांच्या वतीने काही सदस्यांनी निप्पाणीचे संस्थानिक आणि राजे सिधोजीराजे यांचे थेट वंशज राजे श्रीमंत दादाराजे नाईक निंबाळकर सरलष्कर (निप्पाणीकर सरकार) व राणीसाहेब सौं. साम्राज्यलक्षमीरजे नाईक निंबाळकर (निप्पाणीकर सरकार) यांची निप्पाणी येथील राजवाड्या मध्ये भेट घेतली.
श्रीमंत दादाराजे यांच्या हल्लीच झालेल्या वाढदिवसानिमित्त व त्यांनां सरकार नियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती केल्या बद्दल सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचा पुष्पहार व शाल घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी श्रीमंत दादाराजे यांनी सकल मराठा समाज बेळगावच्या कार्या विषय माहिती घेतली आती समाजाची उन्नती आणि प्रगती कसी करता येईल, या विषयी चर्चा व मार्गदर्शन केले. यावेळी निप्पाणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री जयराम मिरजकर यांच्या उपस्थितीत श्रीमंत दादाराजे निप्पाणीकर सरकार व राणी साहेब सौ. साम्राज्यलक्षमीराजे निप्पाणीकर सरकार यांना बेळगाव येथे १५ में २०२२ रोजी होऊ घातलेल्या ‘गुरुवंदना’ कार्यक्रमासाठी सकल मराठा समाज बेळगावच्या वतीने निमंत्रीत करण्यात आले.
या कार्यक्रमाला सकल मराठा समाजाचे सदस्य साहित्यिक श्री गुणवंत पाटील, सिमा सत्याग्रही महादेव पाटील, श्रीमंत दिलीपराव रायजादे (सरकार), श्रीमंत रमेशराव रायजादे (सरकार), श्री विक्रम गायकवाड, धडाडीचे युवा कार्यकर्ते श्री सागर पाटील, श्री राहुल मुचंडी, श्री विशाल कंग्राळकर, श्री उदय पाटील, श्री पवन म्यागोटे, आदी उपस्थितीत होते.