सकल मराठा समाज बेळगाव, यांच्या वतीने काही सदस्यांनी काल दि. २४ एप्रिल २०२२ रोजी गडहिंग्लज तालुक्यातील कसबा नूल येथील मराठा समाजाच्या रामनाथगिरी (समाधी) मठाचे मठाधिपती जगतगुरु राष्ट्रीय धर्माचार्य श्री श्री भगवानगीरी महाराज यांची भेट घेऊन पुष्पहार व शाल घालून समाजा तर्फे सत्कार करण्यात आला.
त्यांना हल्लीच काशी धर्म पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य, स्वामी नारायणनंद सरस्वती, सुमेरू मठाचे जगद्गुरू शंकराचार्य, परमपूज्य नरेंद्रनंदजी सरस्वती, परमपूज्य नामदेव महाराज हरड यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय धर्माचार्य म्हणून घोषित करण्यात आले.
मुंबई येथे झालेल्या धर्मसभेत भारतातून आलेल्या साधुसंतांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या सोहळ्यात ही पदवी भगवानगिरी महाराजांना देण्यात आली. ह्याच समारंभात महाराष्ट्राचे मंत्री एकनाथ शिंदे यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
तसेच परमपूज्य जगतगुरु राष्ट्रीय धर्माचार्य श्री श्री भगवानगीरी महाराज यांना कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या संस्कृत भाषा प्रसारासाठी तज्ञ सल्लागार तथा मुख्य प्रवर्तक म्हणून निवड करण्यात आली आहे. दि. १५ में २०२२ रोजी होऊ घातलेल्या ‘गुरुवंदना’ कार्यक्रमासाठी सकल मराठा समाज बेळगावच्या वतीने निमंत्रीत करण्यात आले.
यावेळी नूल येथील युवा कार्यकर्ते श्री अमरनाथ तेलवेकर यांच्या उपस्थितीत, मठाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक श्री प्रकाश तेलवेकर यांनी मठाच्या इतिहास व कार्या विषय माहिती दिली . या छोटेखानी कार्यक्रमाला सकल मराठा समाजाचे सदस्य साहित्यिक श्री गुणवंत पाटील, सिमा सत्याग्रही महादेव पाटील, श्रीमंत दिलीपराव रायजादे (सरकार), श्रीमंत रमेशराव रायजादे (सरकार), श्री विक्रम गायकवाड, धडाडीचे युवा कार्यकर्ते श्री सागर पाटील, श्री राहुल मुचंडी, श्री विशाल कंग्राळकर, श्री उदय पाटील, श्री पवन म्यागोटे, आदी उपस्थितीत होते.