आता पुन्हा एकदा बेळगावकरांना भारतीय नौदल वाद्यवृंदाच्या संगीत मैफलीचा आनंद लुटता येणार आहे. सदर कार्यक्रमात बहारदार कार्यक्रम होणार असून रविवार दिनांक 1 मे रोजी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत या वाद्यवृंदाची संगीत मैफिल बेळगावकरांना अनुभवता येणार आहे.
येथील माजी नौदल कर्मचारी संघटना बेळगाव यांच्या वतीने टिळकवाडी येथील आरपीडी महाविद्यालयाच्या मैदानावर भारतीय नौदल वाद्यवृंदाच्या संगीत मैफिलीचे आयोजन केले आहे.भारतीय नौदलाच्या वाद्यवृंदाचे देश-विदेशात अनेक कार्यक्रम झाले आहेत .तसेच बेळगावात यापूर्वी दोन वेळा सदर वाद्यवृंद कार्यक्रम पार पडला आहे.
रविवारी सायंकाळी आयोजित केलेल्या भारतीय नौदल वाद्यवृंदाच्या संगीत मैफलीचा आनंद घ्यावा असे आवाहन माजी नौदल कर्मचारी संघटना बेळगावचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी केले आहे