आमदार अनिल बेनके यांनी केलेल्या सूचनेनुसार येथील सदाशिव नगर स्मशानभूमी मधील खराब झालेले पत्र्याचे शेड बदलण्यात आले आहेत. आमदारांनी केलेल्या एका सूचनेमुळे शेड बदलण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
आमदार अनिल बेनके हे सदाशिवनगर स्मशानभूमीच्या पाहणी करिता गेले होते यावेळी त्यांनी स्मशानभूमीची पाहणी केली आणि या ठिकाणी कोणत्या सुविधा अपुऱ्या आहेत त्याबद्दल सूचना केल्या.
तसेच डिझेलवर चालणाऱ्या शवदाहिनी याचीही पाहणी केली. यावेळी त्यांनी मेघा गॅस स्म्शानभूमी साठी सीएसआर निधीतून भूमिगत गॅस पाईप लाईन घालण्याची सूचना देखील केली .याप्रसंगी आमदार अनिल बेनके साहिल काजूकर यांच्यासह सदाशिवनगर मधील रहिवासी उपस्थित होते