येथील चव्हाट गल्ली स्मशानभूमीमध्ये रविवार दिनांक 1 मे रोजी सकाळी 6:30 वाजता प्लांटेशन ड्राईव्ह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम सुरेंद्र अनगोळकर फाउंडेशन आणि ग्रीन सेविअर्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचा उद्देश पर्यावरण सुरक्षित रहावे आणि नागरिकांना शुद्ध हवा मिळवून ते दीर्घायुष्यी व्हवे असा आहे.
शहराच्या मध्यभागी मिनी जंगल निर्माण करण्याकरिता सदर उपक्रम हाती घेण्यात आला आहे.त्यामुळे या कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहेत.