No menu items!
Monday, December 23, 2024

5 मे रोजी खानापूर म. ए. समितीची निर्धार सभा

Must read

१ मे २०२२ रोजी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या १६ सदस्यांची बैठक माजी तालुका पंचायत सभापती मारुतीराव परमेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी खानापूर तालुक्याचे माजी आमदार दिगंबर पाटील, यशवंत बिर्जे, प्रकाश चव्हाण, मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, विवेक गिरी, माजी जि. पं. सदस्य जयराम देसाई, नारायण कापोलकर, गोपाळ पाटील, सूर्याजी पाटील, सुरेश देसाई, धनंजय पाटील, निरंजन सरदेसाई, राजाराम पाटील, बळीराम पाटील, इत्यादी समिती नेते उपस्थित होते.

यावेळी २०१८ सालाच्या विधानसभा निवडणुकीकरिता निवडणूक ठेवी संदर्भात श्री. आबासाहेब दळवी आणि रुकमाणा झूंजवाडकर यांनी ॲड. गजानन देसाई यांच्या मार्फत न्यायालयीन दावा मागे घेण्याचे सोपस्कार पूर्ण केले. यावेळी ॲड. अरूण सरदेसाई, पांडुरंग सावंत, मारुती गुरव इत्यादी समिती नेते हजर होते.

माजी सभापती मारुती परमेकर व माजी आमदार दिगंबर पाटील यांनी सभेतील चर्चेतून झालेला निर्णय खालील प्रमाणे जाहीर केला. गुरूवार दिनांक ५ मे २०२२ रोजी सकाळी ठीक ११ वाजता राजा शिवछत्रपती स्मारकात पुष्पहार घालण्यासाठी तालुक्यातील सीमासत्याग्रही, खानापूर तालुका युवा म. ए. समिती व आजी – माजी तालुका पंचायत सदस्य, जिल्हा पंचायत सदस्य व म. ए. समिती नेते व कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने हजार राहावे व तेथून चौराशी मंदिर खानापूर या जागरूक देवस्थानी जाऊन म. ए. समितीची पुनर्बांधणी करण्यासाठी शपथबद्ध व्हावे व संध्याकाळी ठीक ७ वाजता कुप्पटगिरी येथून खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची निर्धार सभा घेऊन म. ए. समितीचा एकवटलेला संदेश पोहचवण्याचा निर्णय एक मताने घेण्यात आला

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!