शहरातील भांदूर गल्ली येथील श्री स्वराज्य मित्र मंडळ यांच्यातर्फे आज सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भांदूर गल्ली येथे आयोजित सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाग क्र. 10 च्या नगरसेविका सौ. वैशाली सिद्धार्थ भातकांडे या उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते विधिवत पूजन करून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी महिला मंडळाच्या सदस्यांनी पाळणा म्हटला. सवाद्य साजरा करण्यात आलेल्या या शिवजन्मोत्सवाप्रसंगी गल्लीतील पंच मंडळी तसेच सिद्धार्थ भातकांडे, श्री स्वराज्य मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेश चौगुले, उपाध्यक्ष संदेश चौगुले, फकीरा चौगुले, विनायक कणबरकर आदींसह युवक मंडळाचे अन्य पदाधिकारी सदस्य महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्य त्याचप्रमाणे गल्लीतील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.