बेळगाव :
बेळगाव चार राज्यांना जोडणारा केंद्रबिंदू असल्याने गुंतवणूकदार बेळगाव कडे आकर्षित होत आहेत. बेंगळूर पाठोपाठ बेळगाव जिल्ह्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी उद्योजक पुढे येऊ लागले आहेत.
त्यामुळे कर्नाटक औद्योगिक विकास प्राधिकरणाने बेळगाव जिल्ह्यात एक हजार एकर ची लँड बँक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
बेळगाव शहरासह जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. केआयएडीबी कडून ठीकठिकाणी लँड बँक निर्माण होत आहे.
गुंतवणुकदारांना सर्व प्रकारच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे औद्योगिक खात्याचे प्रभारी संयुक्त संचालक एस भिमाप्पा यांनी सांगितले आहे.
बेळगाव शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर नवे औद्योगिक क्षेत्र निर्माण करावे अशी उद्योजकांची मागणी असल्याने तसेच ऑटोमोबाईल उपकरणे विमानांचे सुटे भाग बेळगावात तयार होत असल्यामुळे उत्पादन क्षेत्रातही मागील काही वर्षात बेळगाव आघाडीवर येऊ लागला आहे.
त्यामुळे उद्योजक बेळगाव कडे आकर्षित होत असून त्यांना जमीन उपलब्ध करून देण्यासाठी केआयडीबी लँड बँक तयार करीत आहे.