बेळगाव :
त्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचा लघु लेख….
श्री पुरंदरदास कर्नाटक संगीताचे पितामह म्हणून प्रसिद्ध आहेत. दास पद्धतीचे अनेक प्रमुख आहेत. प्रामुख्याने पुरंदरदास, श्रीपादराय, कनकदास, जगन्नाथदास, विजयदास आणि कमलेश विठ्ठल इत्यादी. यांनी संगीताच्या माध्यमातून भक्तीमार्गाचे प्रबोधन केले. पुरंदरदासांच्या सर्व कीर्तनांचा पुरंदर विठ्ठलाला (विष्णुला) नमन करूनच शेवट होतो.
सहस्रो कीर्तनांची (भगवंताची स्तुती करणारी गीते) रचना करणार्या पुरंदरदासांची १००० कीर्तने आज देखील प्रचारात आहेत. यांची सर्व कीर्तने कन्नड भाषेत असून त्यांचा उद्देश भक्तीमार्गाचा जनसामान्यांना परिचय करून देणे, हाच आहे. कर्नाटक संगीतकारांमध्ये पुरंदरदासांच्या कीर्तनांचा परिचय नसलेले कोणीही नाहीत, असे म्हणता येईल. पुरंदरदासांनी ५ लक्ष गीतांची रचना करण्याचे ध्येय ठेवलेले होते. त्यांनी ४,७५००० गीतांची रचना करून आपला अवतार संपवला. त्यांचा मुलगा मध्वपतीदास यांनी उरलेल्या २५००० गीतांची रचना केली, असे सांगितले जाते.