बेळगाव :
कॅम्प जवळील फिश मार्केट समोरील चर्च समोर एक व्यक्ती रोडवर निद्रिस्त अवस्थेत होती. यावेळी या व्यक्तीची विचारपूस फेसबुक फ्रेंड सर्कल च्या सदस्यांनी केली असता तो व्यक्ती पंजाब भटिंडा येथील असल्याचे समजले. त्या व्यक्तीस सुरक्षितपणे त्याच्या गावी पाठविण्यात आले आहे. प्रथम सदर व्यक्तीस श्रीराम सेना हिंदुस्तान च्या रुग्णवाहिके मधून खासबाग येथील सरकारी निवारा गृहात पाठविण्यात आले.
त्यानंतर त्या व्यक्तीला फेसबुक फ्रेंड सर्कल तर्फे बेळगावचे पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी यांच्या मदतीने पंजाब भटिंडा येथे पाठविण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांच्या पाठिंब्याने निजामुद्दीन ट्रेन मधून पाठविण्याची व्यवस्था केली. काल सायंकाळी 7.45 सुमारास परमिंदर सिंग यांना पंजाब येथे पाठविण्यात आले. याकामी डॉ. रोहित जोशी, बेळगाव केसरीचे संस्थापक संपादक डॉ गणपत पाटील, प्रमोद शर्मा ,सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर, प्रमोद शर्मा पृथ्वीराज श्रेयकर यांनी मदत केली.