शिवजयंती शांततेत साजरी करण्याचे आवाहन चित्ररथ महामंडळाने सर्व शिवभक्तांना केले आहे. मिरवणुकीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून असंख्य शिवप्रेमी मेहनत घेत आहेत. शिवजन्मभूमीपासून राज्याभिषेकापर्यंतचा इतिहास या शोभायात्रेतून उलगडणार आहे.
शिवजयंती उत्सव मंडळाने दुपारी 4 वाजेपर्यंत नरगुंदकर भावे चौकात येण्याचा प्रयत्न करावा. मिरवणूक वेळेवर सुरू करून नागरिकांना चित्ररथ देखाव्याचा आनंद घेण्याची संधी देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आणि अनुचित प्रथा टाळण्यासाठी महामंडळाचे 100 हून अधिक स्वयंसेवक मिरवणुकीत कार्यरत असतील.
प्रत्येक मंडळाने शिस्त पाळावी असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस जे.बी.शहापूरकर, उपाध्यक्ष राहुल शरद जाधव पाटील, मेघन लंगरकांडे, प्रसाद मोरे, विनायक बावडेकर, प्रशांत भातकांडे, संतोष कणेरी यांनी केले आहे. कोणत्याही मदतीसाठी 9964370261 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अध्यक्ष सुनील जाधव यांनी केले आहे.