बेळगाव उत्तर मतक्षेत्रातील आमदार अनिल बेनके यांनी शहरात बसव जयंती निमित्त जिल्हा प्रशासन, अखिल भारत वीरशैव महासभा आणि विविध लिंगायत संघटना यांनी बसवेश्वर सर्कलमध्ये विश्वगुरु बसवण्णा यांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण केले.
या संदर्भात जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलिस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या, अखिल भारत वीरशैव महासभा जिल्हा महिला घटकच्या अध्यक्षा श्रीमती रत्नप्रभा बेल्लद आणि इतर लिंगायत संघटना व बसवादी प्रमुख, भक्त या सर्वांनी पुष्पहार अर्पण करून बसव जयंती साजरी केली.
त्यानंतर बेळगांव कोर्ट आवारामध्ये बेळगांव बार असोसिएशन वतीने विश्वगुरु बसवण्णा जयंतीमध्ये भाग घेवुन बसवेश्वरांच्या फोटोचे पुजन केले. या संदर्भात बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले की, सर्वप्रथम सर्वांना बसव जयंतीच्या शुभेच्छा दिल्या .
गेल्या दोन-तीन वर्षापासून कोविड आणि विविध अडचणींमुळे बसव जयंती उत्साहाने साजरी केली नाही त्यामुळे यावर्षी मोठ्या उत्साहात बसव जयंती साजरी करण्यात येत आहे