शिवरायांवर सर्वांची भक्ती आणि श्रद्धा आहे. मात्र असे अनेक भक्त आहेत जे आपल्या घरावर महाराजांची मूर्ती स्थापून सर्वांना महाराजांची प्रेरणा सर्वांना देत आहेत. येथील वडगाव मधील अशाच काही दोन भावंडांनी आपल्या घरावर साडेसात फूटी शिवरायांची मूर्ती अक्षय तृतीया निमित्त स्थापन केली आहे.
त्यामुळे वडगाव परिसरासह बेळगाव शहरातही या भावंडांचे कौतुक होत आहे. याआधीही बेळगाव मध्ये दोन व्यक्तींनी शिवरायांची मूर्ती आपल्या घरावर स्थापन केली आहे. तर आता पाटील भावंडांनी शिवरायांची मूर्ती आपल्या घरावर प्रतिष्ठापना करून शिवरायांचा आदर्श सर्वांनी घ्यावा ध्यास मनी बाळगला आहे.
भूषण पाटील आणि संदीप पाटील अशी या दोन भावंडांची नावे असून ते ज्ञानेश्वर नगर वडगाव गाडे मार्ग येथील रहिवासी आहेत. त्यांनी शिवरायांचे ही साडे सात फुटी मूर्ती मूर्तिकार संजय किल्लेकर यांच्याकडून बनवून घेतली आहे.
आज अक्षय तृतीया च्या शुभमुहूर्तावर या दोन भावंडांनी गल्लीतील पंच मंडळीच्या हस्ते शिवरायांची विधिवत पूजा केली. तसेच त्यांना पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. यावेळी गल्लीतील पंच मंडळी आणि महिला शिवप्रेमी उपस्थित होते.