जीवन संघर्ष फाऊंडेशन ,फेसबुक फ्रेंड सर्कल आणि कॅम्प पोलिस स्टेशन टीम यांच्या समन्वयाने एका वृद्ध असामान्य महिलेला (वय 60+) BIMS हॉस्पिटल बेळगावमध्ये दाखल करण्यात आले .
यावेळी बेळगाव शहरात भाजीपाला विकण्यासाठी आलेल्या हिंडलगा सुळगा येथील ग्रामस्थांनी या वृद्धमहिलेला प्रथमतः पाहिले. ती वाहने आणि नागरिकांवर दगडफेक करत होती. ती आजूबाजूच्या गावातील असल्याचे समजून जीवन संघर्ष फाऊंडेशन गाव सुळगा हिंडलगाचे प्रमुख डॉ.गणपत पाटील यांना तातडीने ही माहिती देण्यात आली .
यावेळी त्यांनी ताबडतोब अवधूत तुडयेकर आणि संतोष दरेकर यांना बोलावले याप्रसंगी पृथ्वीसिंग फाउंडेशनचे प्रमुख पृथ्वीसिंग मदततीसाठी उपस्थित होते.
यावेळी त्या वृद्धेबद्दल बेळगावचे डीसीपी रवींद्र गडादी कॅम्प पोलिस स्टेशन टीम श्री प्रभाकर धर्मट्टी-सीपीआय
श्री गुरुसिद्धप्पा कोताबगी-एचसी, श्रीमती रेखा वालाके-डब्ल्यूपीसी, श्री शिवानंद तोरवी-पीसी हे सर्वजण पाठिंबा देण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. यावेळी तातडीने त्या व्यक्तीस 108 रुग्णवाहिका बोलावून बेळगाव येथील बिम्स हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.